Majhi ladki Bahin Yojana Status : नारी शक्तीदूत अ‍ॅप वरून आपल्या अर्जाचे स्टेटस पहा

ज्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले असतील ते आता कुठेही न जात आपल्या स्वतः च्या मोबाईल च्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपला अर्ज पात्र झाला कि अपात्र झाला ते पाहू शकतात.

राज्य सरकारने जाहीर केले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ महिलांना मिळणार आहे, जरी त्यांनी अर्ज लवकर केला तरी आणि जरी अर्ज उशिरा केला तरी. परंतु ज्या महिलांचा अर्ज पूर्ण झालेला असेल आणि पात्र झालेला असेल अशा महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी पासून लाभहस्तांतरण करण्यास सुरुवात केली आहे.

म्हणजे जर तुम्ही आता पात्र असाल किंवा तुमचे नाव पात्रता यादीत असेल तर तुम्हला जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून एकूण ४,५०० रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील.

नारी शक्तीदूत अ‍ॅप वरून आपल्या अर्जाचे स्टेटस पहा

जर तुमच्या जिल्ह्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी आली असेल तर Download करा,आणि यादीत तुमचे नाव तपासा. परंतु काही जिल्ह्यांची पात्रता यादी अजून आलेली नाही अशा लाभार्थ्यांनी आपला अर्ज पात्र झालेला आहे का नाही ते कसे तपासावे यांच्याविषयी खाली माहिती दिलेली आहे

लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड

Majhi ladki Bahin Yojana Status

सर्वप्रथम तुम्हाला आपल्या फोने मध्ये नारी शक्तिदूत हे अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावे लागेल, जर अ‍ॅप डाउनलोड केलेले असेल तर गुगळे प्ले स्टोर वरती जाऊन ते उपडेट करून घ्यावे.
आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकून अ‍ॅप मध्ये लॉगिन करून घ्यावे. जर लॉगिन करताना काही अडचणी येत असतील तर थोड्या वेळाने पुन्हा लॉगिन करण्याचा प्रयत्न करावा, लॉगिन होऊन जाईल.

लॉगिन केल्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर होम स्क्रीन वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नावाचा पर्याय दिसेल तिथून तुम्ही अर्ज करू शकता. आपल्या केलेल्या अर्जाचे स्टेटस चेक करायचे असेल तर खालील आडव्या बार मध्ये दिसणाऱ्या केलेले अर्ज या पर्यायावर टच करा.

आता तुम्हाला तुमच्या या मोबाईल नंबर वरून केलेल्या सर्व अर्जाची यादी दिसेल. तुम्हाला ज्या अर्जाचा स्टेटस पाहायच्या आहे त्याच्यावरती क्लिक करा.

Majhi ladki Bahin Yojana Status Check

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी

Pending to Submitted / प्रलंबित ते सबमिट केलेले:
सर्वेक्षण भरलेले आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेले नाही. अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे.

Approved / मंजूर:
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे. सबमीटर कडून आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

In Review / पुनरावलोकनातः
सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे. सबमिटर फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे.

Rejected / नाकारलेः
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही. हे पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही.

Disapproved – Can Submit and Resubmit / अस्वीकृत – संपादित करून पुन्हा सबमिट करू शकताः
सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे.

Leave a Comment