Mukhyamantri Annapurna Yojana 2024: राज्यातील कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलेंडर चे मोफत पुनर्भरण करून देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राज्य शासनाने १ जुलै २०२४ पासून जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी कोण पात्र असेल, अर्जप्रक्रिया काय असेल आणि या योजनेची पात्र लाभार्थी यादी आपण या पोस्ट च्या माध्यमातून पाहणार आहोत.
Mukhyamantri Annapurna Yojana – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटूंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-२०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती. उज्ज्वला योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना मोफत गॅसजोडणी देण्याचे काम गॅस वितरण कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे.
सध्या महाराष्ट्रातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गॅसजोडणी घेतलेले तसेच, या योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅसजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस सिलेंडरचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच, एक सिलिंडर संपल्यानंतर दुसरे सिलिंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे, बरेच लोक वृक्षतोड करुन लाकडाचा इंधन म्हणून वापर करून स्वयंपाक करत आहेत.
- Mukhyamantri Annapurna Yojana 2024 – पात्रता, लाभार्थी यादी आणि अर्जप्रक्रिया
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download करा, यादीत तुमचे नाव तपासा
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड
सादर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा केलेली आहे. मुख्यामंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करुन दिले जाईल.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक ३ गॅस सिलेंडरचे पुनर्भरण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्यात येईल.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्रता
राज्यातील कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलेंडर चे मोफत पुनर्भरण करून देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राज्य शासनाने १ जुलै २०२४ पासून जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या संबंधित गॅस एजंसी कडे जाऊन e-KYC करून घेणे बंधनकारक केलेलं आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करून घ्यावे लागणार आहे (जर तुम्हाला आधीपासूनच गॅस सिलेंडर खरेदी वर केंद्र सरकारची ३०० रुपये सबसिडी मिळत असेल तर तुम्ही पात्र आहातच).
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- सद्य:स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थी Mukhyamantri Annapurna Yojana साठी पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटूंब सदर योजनेस पात्र असेल.
- एका कुटूंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एक लाभार्थी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र असेल.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना अनुज्ञेय असेल.
मुख्यामंत्री अन्नपूर्णा योजना अर्जप्रक्रिया
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राज्य शासनाने १ जुलै २०२४ पासून सुरु केलेली आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या सर्वच लाभार्थ्यांना प्रश्न पडलाय कि मुख्यामंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी कोणतेही अधिकृत पोर्टल किंवा ऍप उपलब्ध नाही. तुमच्या घरातील गॅस कनेक्शन जर महिलेच्या नावावर असेल आणि तुम्ही जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी थेट पात्र झालेले आहात.
जर तुमच्या घरातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असेल तर तुम्हीपण मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना या योजनेचा लाभ घेऊ शकता. लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजंसी मध्ये जाऊन तुमची e-KYC पूर्ण करून घ्यायची आहे.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना लाभार्थी यादी
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना राबविण्यासाठीचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना स्वयंपाकासाठी लागणारे इंधन म्हणजेच LPG गॅस मोफत उपलब्ध करून देणे आणि पर्यावरण संरक्षण करणे हा आहे.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थी महिला तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असणार लाभार्थी.
त्यामुळे जर तुमचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेसाठीही पात्र आहात, त्यामुळे आताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचे नाव चेक करा
सध्या LPG गॅस सिलेंडर भरून घेण्यासाठी ८३० रुपये इतकी रक्कम द्यावी लागते, परंतु ज्या महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या कार्ड द्वारे गॅस भरून घेतात त्यांना ३०० रुपये त्यांच्या ख्यात्यावरती सबसीडी च्या रूपाने परत मिळतात.
अशाप्रकारे केंद्र सरकारच्या ३०० रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन ५३० रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे. म्हणजेच तुम्हाला ८३० रुपये देऊन गॅस भरून घ्यावा लागेल आणि नंतर ते ८३० रुपये तुम्हाला सबसिडी च्या रूपाने तुमच्या आधार लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यामध्ये परत मिळतील.
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना स्टेटस
जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल किंवा पात्र असाल तर तुम्ही Mukhyamantri Annapurna Yojana साठी पात्र आहात. परंतु जर तुम्हाला अजून पर्यंत तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का नाही ते माहित नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमचे स्टेटस कसे चेक करायचे ते पहा.