सोयाबीन आणि कापूस अनुदान जाहीर: 10,000 रुपये मिळणार, अनुदान जमा झाले की नाही पाहा

सोयाबीन आणि कापूस अनुदान 2024: राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील खरीप हंगाम २०२३ मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५००० रुपये अनुदान जाहीर केले गेलेलं आहे. हे अनुदान जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत लागू असेल, म्हणजेच शेतकऱ्याला जास्तीत जास्त १०,००० रुपये इतके अनुदान मिळेल. सोयाबीन आणि कापूस यासाठी राज्य शासनाने ४,२०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे. या अनुदानाचा फायदा राज्यातील ६५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.

soyabean kapus anudan yaadi

सोयाबीन व कापूस अनुदान योजना काय आहे?

२०२३ च्या खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि इतर कारणांमुळे झालेल्या दरातील घसरणीला समोर जावं लागलं होत. त्यामुळे त्यांचा शेतमाल कमी किमतीत विकला गेला आणि शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं होत. यामुळेच राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनातून या शेतकऱ्यांना भावांतर योजना लागू करून ५००० रुपय प्रति हेक्टर मदत करण्याची घोषणा केली होती.

राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना:
जर २० गुंट्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर सरसकट १००० रुपये अनुदान वितरित केले जाईल,
आणि २० गुंट्यांपेक्षा जास्त व २ हेक्टर पर्यंत असेल तर प्रति हेक्टर ५००० रुपये आणि जास्तीत जास्त १०,००० रुपये इतके अनुदान वितरित केले जाईल.

हे अनुदान शेतकऱ्याच्या आधार लिंक असणाऱ्या बँक खात्यामध्ये DBT च्या माध्यमातून वितरित केले जाईल.

अनुदान मिळवणासाठी कोणते शेतकरी पात्र असतील

  • राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक पाहणी ॲप/पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच या अनुदानाकरिता पात्र राहतील.
  • ई-पीक पाहणी ॲप/ पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील.
  • सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतक-याच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरणाच्या (DBT) माध्यमातूनच अर्थसहाय्य जमा करण्यात येईल.
  • सदर योजना फक्त सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादीत राहील.

सोयाबीन आणि कापूस पेमेंट स्टेटस चेक करा मोबाईल वरून

सोयाबीन आणि कापूस पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमच्या आधार कार्ड द्वारे कसे स्टेटस चेक करायचे ते पाहा.

सोयाबीन आणि कापूस अनुदान यादीत तुमचे नाव तपासा

जर तुम्ही वरील पात्रता निकष नुसार पात्र असाल आणि तुम्हीपण सॅन २०२३ मधील खरीप हंगामात सोयाबीन किंवा कापूस उत्पादन घेतले असेल आणि ई-पीक पाहणी वर नोंद केली असेल तर तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून तुमचे नाव किंवा पेमेंट स्टेटस चेक करा:

Leave a Comment