सोयाबीन आणि कापूस पेमेंट स्टेटस चेक करा मोबाईल वरून | अनुदान यादी पाहा

सोयाबीन कापूस अनुदाना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ३० सप्टेंबर पासून अनुदान जमा होणार आहे आणि त्या अंतर्गत आता लाभार्थ्यांच्या याद्या आलेल्या आहेत तुम्ही तुमचं नाव जे आहे ते त्या यादीमध्ये पाहू शकता आता तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईल मधून यादीमध्ये नाव चेक करायचं हे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहे.

सोयाबीन आणि कापूस अनुदान पेमेंट स्टेटस चेक कसे करावे

सोयाबीन आणि कापूस पेमेंट स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला राज्य शासनाच्या uatscagridbt.mahaitgov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्यासाठीच हे पोर्टल बनवले गेलेलं आहे.

या वेबसाईट वरती आपल्याला दोन ऑप्शन दाखवले जात आहेत एक म्हणजे लॉगिन आणि दुसरा डिसबर्समेंट स्टेटस लॉगिन मधून कृषी विभागाचं लॉगिन केले जाते आणि त्याच ठिकाणी सुद्धा केवायसी केली जाऊ शकते.

आता डिसबर्समेंट स्टेटस वरती क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर विचारला जाईल आधार नंबर याच्यामध्ये एंटर करायचा आहे याच्या खाली आपल्याला एक कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि आपल्याला केवायसी कशा पद्धतीने करायची हे या ठिकाणी विचारलं जातंय याच्यामध्ये बायोमेट्रिक आणि ओटीपी असे दोन ऑप्शन आहेत.

त्यामधून ओटीपी चे ऑप्शन आपण सिलेक्ट करा ओटीपी चे ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर आपल्या या आधार नंबर वरती ओटीपी जनरेट करा सेंड करण्यासाठी जे एक ऑप्शन दाखवले जाईल त्याच्यावरती ओटीपी सेंड करण्यासाठी क्लिक करायचंय आपला जर नंबर याच्याशी लिंक असेल किंवा आपलं जर या अनुदान योजनेमध्ये नाव असेल हे असेल तर आपल्याला हा ओटीपी पाठवला जाईल.

अशाप्रकारे माहिती या ठिकाणी दाखवली जाईल त्याला ओके करायचंय आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबर वरती एक ओटीपी पाठवला जाईल हा ओटीपी आपल्याला आलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर आपल्याला गेट डाटा वरती क्लिक करायचंय गेट डाटा वरती क्लिक केल्याबरोबर आपला ओटीपी व्हेरिफाय झाल्याबरोबर आपल्याला पुढे आपली जी काही लाभार्थ्याची शेतकऱ्याची जी माहिती आहे ती सर्व त्या ठिकाणी दाखवली जाईल.

या पोर्टलवरती जर तुम्हाला तीन नंबरचा एक ऑप्शन आहे फार्मर सर्च हा ऑप्शन दिसत असेल तर आपण लाभार्थी यादी पाहू शकता किंवा जर तुम्हाला हा ऑप्शन दिसत नसेल तर, डिसबर्समेंट स्टेटस या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय आहे आणि आपलं पेमेंट स्टेटस चेक करायचं आहे.

Leave a Comment